दिवाळी
दिवाळी हा एक उत्सव नाही तर उत्सवाचं एक संमेलन आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपुजन(दिवाळी), बलिप्रतिपदा, आणी भाऊबीज अशा पाच उत्सवाचं संमेलन म्हणजे दिवाळी. पण आज आपल्याकडे कोणतीही गोष्ट शुध्द स्वरूपात राहिलेली नाही. प्रत्येक गोष्टीला काही न काही अंधश्रद्धा चिकटलेली आहे. आज आपण त्याचाच थोडा विचार करणार आहोत.
धनत्रयोदशी
धनत्रयोदशी च्या दिवशी आपल्या धन-संपत्ती देवापुढे मांडुन आरती म्हणुन पुजा करायची, आणि असं नाही केलं तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व आपण आयुष्याभर लक्ष्मीहीन होतो.
या गोष्टीच्या मुळात जाऊन पाहिलं तर एक दिवस पुजा करून खुश होईल लक्ष्मी एवढी लाचार/ तुच्छ नाही. एक दिवस पुजा करणाऱ्यावर लक्ष्मी कधीही खुश होत नाही. तसेच वर्षातुन एकदा आईची पुजा करणारा मुलगा आईला कधीही प्रिय नसतो. लक्ष्मीला आई समजुन, पूजनीय मानून आपल्या ऋषींना गायले आहे की-
ऊँ महालक्ष्मी च विदमहे, विष्णुपत्नी च धीमहि, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात।।
म्हणून वर्षभर लक्ष्मीची पूजा करणाऱ्याच्या घरातच लक्ष्मी पिढ्यानपिढ्या स्थिर झालेली दिसते. रघुवंशी राजे याचं उत्तम उदाहरण आहे.
नरक-चतुर्दशी
या दिवसाला काली-चतुर्दशीही म्हणतात. या दिवसामागे एक दंतकथा आहे कि या दिवशी सौंदर्याचा शिकारी नरकासुर नावाच्या राक्षसाला मारून श्रीकृष्णाने त्याने बंदी केलेल्या १६००० स्त्रियांना मुक्त केले, व जेव्हा त्यांच्या पावित्र्याचा विषय आला तेव्हा कृष्णाने स्वत: ती जबाबदारी घेतली व त्यांना पत्नी मानले.
नरकासुराच्या त्रासातून मुक्त झाल्याच्या खुशीत लोकांनी हा उत्सव साजरा केला. पण आजचे प्रेमी म्हणतात कि कृष्णाने इतक्या बायका केल्या मग आम्ही एखादी जास्त केली तर कुठे बिघडले? पण यांना एक गोष्ट सांगितली पाहिजे कि कृष्णाने स्वीकारलेल्या १६००० स्त्रियांना समाज स्वीकारत नव्हता म्हणून कृष्णाने त्यांना पत्नी म्हणुन स्वीकारलं. आपण देखील स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. कारण स्त्री ही समाजाचा एक महत्वाचा घटक आहे.
दिवाळी(लक्ष्मीपूजन)
यादिवशी घरासमोर दिवे पेटवल्यास वर्षभराचा अंधार नाहीसा होतो. पण आज Technology चा वापर करून Artificial Moon तयार करणारे आपण आपल्याला तर हे पटणारच नाही ना.
म्हणुन बुद्धिमान लोकांनी हे समजुन घ्यावं कि घरासमोर मातीचा दिवा लावण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीच्या हृदयात विचारांचा दिवा पेटवला तर त्याचं सगळं आयुष्याचं उजळून निघेल, आणी हळूहळू संपूर्ण सृष्टी तेजोमय होईल.
बलिप्रतिपदा
हा दिवस व्यावसायिक लोकांचा नववर्षाचा तसेच वह्या पूजनाचा दिवस. या दिवशी धंद्याचा हिशोब करून योग्य नियोजन करावं, असे केल्यास धंदा व्यापार वाढतो.
पण याचा भावार्थ घ्यायला गेलं कि कळतं कि फक्त व्यवसायाचाच नाही तर पूर्ण जीवनाचाच हिशोब ह्या दिवशी करायाला पाहिजे. वर्षभर कोणासाठी जगलो, वेळ, पैसा कोणासाठी खर्च केला? ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब करून पुढील वर्षासाठी योग्य नियोजन केलं कि धंदा च काय तर आयुष्य देखील वाढेल.
भाऊबीज
या दिवशी बहिणीने भावाला ओवाळले आणी भावाने ओवाळणी स्वरुपात भेट दिली की, भावाचं कल्याण होत असा समाज समाजात स्थिर आहे.
म्हणून आपल्याकडे "इडा पिडा जावो, बळीच राज्य येवो"अशी म्हणदेखील प्रसिद्ध आहे. पण बहिणीने ओवाळून भाऊ महान होतो ही गोष्ट समजायला थोडी जड जाते, व थोडा विचार केल्यास समजते कि भाऊ जेव्हा सामान्य जीवन जगतो तेव्हा संवेदनशील बहिणीला ते असह्य होते.ती बहिण आपला भाऊ असामान्य जीवन जगावा अशी इच्छा बाळगते, जसा बीजेचा चंद्र हा कर्तृत्वाचं प्रतिक आहे तसंच या दिवशी भावाला ओवाळतांना भाऊ बीजेच्या चंद्रासारखा कर्तृत्ववान बनावा अशी तिची भावना असते.
आपला भाऊ यशाच्या उंच शिखरावर जावा अशी मंगल कामना बाळगणाऱ्या बहिणीच्या हृदयातून भावाला ओवाळतांना भावाच्या जीवनावर तशाच प्रकारच्या आशीर्वादाची बरसात होते. म्हणून म्हंटले जाते कि भावाला बहिणीने ओवाळले कि भावाचे कल्याण होते.
वरील सगळ्या गोष्टी/अंधश्रद्धा बघिल्यावर त्या पाळू नये असं नाही, पण त्याचा अर्थ समजुन पालन करावं. दिवाळी या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या सणाबद्दल बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी माहित झाल्या. नवीन कपडे, फटाके, फराळ, आणी परंपरेने आलेल्या अंधश्रद्धेच पालन यालाच आपण दिवाळी समजत होतो. पण पहिल्या ब्लॉग मध्ये जसं आपण विज्ञानाचा खरा अर्थ पाहिला तेव्हापासून आपण प्रत्येक गोष्टीच्या मुळात जाऊन विचार करतो. इथून पुढे देखील आपण अशाच अंधश्रद्धा मागील विज्ञान/शास्त्र समजुन घेण्याचा प्रयत्न करूया.
|| शुभ दिपावली ||
0 टिप्पण्या
how do you feel after read the blog?
If you have any doubt or suggestions about blog,
Please let me know.