भारतीय महिला फक्त चूल आणि मुल साठीच ? | Reality of Indian Women

*This is my self opinion not intentionally heart someone's community, gender, and all
So read and enjoy our article Indian women*



यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता... 

    ...असे म्हणून स्त्रियांचा सन्मान करणारा, तिला देवता मानणारा आपला देश आहे. आपल्या इथे कोणतीही क्रांती झाली असेल तर तिच्या मुळात स्त्री च कर्तृत्व आहे. रामायणासारखी आदर्श समाजव्यवस्था मिळाली सीता, कौसल्या, सुमित्रा, कैकयी अशा कर्तृत्ववान स्त्रीयांमुळे. महाभारतासारखा आदर्श जीवनग्रंथ मिळाला कुंती, देवकी, द्रौपदी, सुभद्रा अशा स्त्रीयांमुळे व हिंदवी स्वराज्याची स्थापना देखील झाली जिजाबाई नावाच्या स्त्रीमुळेच. पण आज शिक्षणामुळे, शिक्षणातील समानतेमुळे कुटुंबात, समाजात एक वाद निर्माण झाला आहे. “स्त्री मोठी कि पुरुष मोठा ”?
    भारतीय संस्कृतीने स्त्रीला ‘महिला’ म्हणून संबोधले आहे. भारतीय स्त्री लक्ष्मी, सरस्वती इतकचं नाही तर महिषासुरमर्दिनी देखील आहे. आपल्याकडे ‘मातृहस्तेन भोजनम् मातृमुखेन शिक्षणम्’ असं म्हणुन स्त्री चा गौरव केला जातो. भगवंताची उत्कृष्ट कलाकृती असणारी स्त्री ही आज तिच्या कर्तव्यापासून, मुळ जीवनापासून दूर जातांना दिसते आहे. स्त्री जीवनाचे जे मुळ कर्तव्ये आहेत जसे कि महानता, हितकारकता, लज्जारक्षण इत्यादींपासून ती कर्तव्यच्युत होतांना दिसते. आणी या सगळ्या गोष्टींच श्रेय जात ते स्त्री-पुरुष समानतेच्या अतिरेकाला. जीवशास्त्रीय दृष्ट्या जरी बघितलं तरी कळेल कि स्त्री आणी पुरुष यांची शरीररचनाच अशी आहे कि ते दोन्ही पूर्णपणे समान असूच शकत नाहीत. मग जर त्याचं शरीरच समान नसेल तर त्या शरीराची कामं कशी काय समान असू शकतात? जी कामं पुरुष करू शकतो ती सर्वच स्त्री करू शकत नाही. आणि जी कामं एक स्त्री करू शकते ते पुरुष करू शकत नाही, उदा: अपत्य संगोपण(बाळाला दुध पाजणे). पण शिक्षणातील समानतेमुळे कुठेतरी परिस्थिती बदलतांना दिसते. ज्या कोर्सला मुलगा ऍडमिशन घेऊ शकतो त्याच कोर्सला मुलगी पण घेऊ शकते. यामुळे परिणाम इतके वाईट दिसतात कि पती-पत्नी नोकरीला, मुलं पाळणाघरात व आईवडील वृद्धाश्रमात. आणि अशाप्रकारे हळूहळू एकत्र कुटुंबपद्धती व संपूर्ण जगात आदर्श ठरलेली भारतीय संस्कृतीच नष्ट होतांना दिसतेय.
    वरील सर्व गोष्टी बघितल्यावर स्त्री ही फक्त चूल व मुल इतकीच मर्यादित आहे असं मुळीच नाही. तिने पुरुषाची बरोबरी जरुर करावी, पण स्वतःमध्ये असलेल्या गुणांना फुलवून त्यांना शोभेल अस जीवन जगावं आणी असं जीवन जगुन वेळ मिळत असेल तर नोकरी जरूर करावी. त्यातच स्त्री जीवनाची सार्थकता आहे, कारण स्त्री-शिक्षण ही काय आजकालची गोष्ट नाही. हजारो वर्षांपूर्वी आमच्या वैदिक संस्कृतीतील लोकांनी देखील स्त्रियांना शिक्षण दिले होते. त्यांच्या मते स्त्री व पुरूष हे अर्धद्विदल आहेत. म्हणून स्त्रीला आपण अर्धांगिनी म्हणतो. अर्धनारी नटेश्वराच्या प्रतिकातदेखील दिसते की अर्धे शरीर स्त्रीचे व अर्धे पुरुषाचे आहे. म्हणजे समाजात, जीवनात स्त्री-पुरुष यांचा समान वाटा असतो. आता समान वाटा असतो म्हणजे पुरुषाचे सर्व काम स्त्री करू शकते असे नाही. तर जेवढे काम पुरुष करू शकतो तेवढ्याच प्रमाणात स्त्रीने देखील तिचे काम केले पाहिजे.
    जी कुटुंबाला, समाजाला महान बनवते, कुटुंबासाठी, समाजासाठी हितकारक बनते, व संस्कृतीची लाज राखते ती महिला. श्रीमंत, कीर्तीवान, सुखी बनणं वेगळं आहे आणि महान बनणं वेगळं आहे. आपल्याकडे पतिव्रता हा शब्द देखील तसाच आला आहे- पतीला महान बनण्याचं व्रत देते ती पतिव्रता. संत, क्रांतिकारक यांच्या आईने, पत्नीने त्यांना श्रीमंत नाही तर महान बनवले.
उदा. १) जहागीरदाराचा मुलगा असलेल्या शिवाजीला जीजाबाईंनी श्रीमंत, सुखी नाही तर त्याच्याकडून संस्कृतीच काम करवून त्याला महान बनवलं.
२) छोट्या नरेंद्राला एकदा पाहुण्यांनी विचारलं कि बाळ तू मोठा झाल्यावर काय बनणार? भिंतीवरच्या चित्राकडे बघत तो म्हणाला “मी ड्राईव्हर होणार”. अशावेळी सामान्य आईवडील असते तर स्वतःचा अपमान मानला असता. पण त्या नरेंद्र ची आई एक महिला होती. ती म्हणाली ‘ हो बाळा. ड्राईव्हरच हो, चालेल.’ व भिंतीवरच्या त्या चित्राकडे बोट दाखवत म्हणाली- ‘ पण त्या अर्जुनाला गीता सांगणाऱ्या त्या कृष्णासारखा ड्राईव्हर हो ’. अशी महानतेची शिकवण मिळालेला नरेंद्र भविष्यात स्वामी विवेकानंद म्हणून जगाला माहिती झाला.
    महान बनण्यासाठी जी सुखकारक नाही तर हितकारक वातावरण निर्माण करते ती महिला. घरातील सगळ्यांना सकाळी लवकर उठण्याचं वळण लावणे, मुलांना संस्कार लावणे-अभ्यास करवणे, घरातील पुरुष मंडळींना उगीचच राजकारणाच्या नादी न लागू देणे, भौतिकतेच्या मागे पळता पळता व्यसनाधीन होण्यापासून रोखणे, या सगळ्या गोष्टी सुखकारक नाही तर हितकारक आहेत. तसेच घरात धार्मिकता टिकवण हे सुखकारक नाही तर हितकारक आहे. घरातील वातावरणच असं असाव कि जे सगळ्यांच्या हिताच ठरेल.
उदा. १)गांधारीने दुर्योधन व इतर कौरवांच सुख बघितलं तर कुंतीने पांडवांच हित बघितलं म्हणून ते कृष्णाबरोबर जोडले गेले, आणी नंतर विश्वविजयी देखील झाले.
२) नचीकेत्याला देखील त्याच्या आईनेच असं घडवलं होतं, कि यमाजवळ गेल्यावर त्याने सुखकारक असलेल्या सगळ्या गोष्टी मिळत असतांनाही न घेता हितकारक असलेली आत्मविद्याच मागितली.
    त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे स्त्री ही लाज राखणारी असली पाहिजे. तिने कुटुंबाची तसेच समाजाचीही लाज राखली पाहिजे. लाज राखणे म्हणजे बेअब्रू होण्यापासून रक्षण करणे. कुटुंबात, समाजात अशी एखादी गोष्ट जिच्यामुळे कुटुंबाची, समाजाची, संस्कृतीची बेअब्रू होईल ती थांबवणे म्हणजे लाज राखणे.
उदा. १)रावणाने पळवून नेलेलं असतांना देखील भारतीय संस्कृतीची बेअब्रू होईल, तिला कलंक लागेल अशी एकही गोष्ट आपल्या वर्तनातून घडू न देणारी सीता, तिनेच संस्कृतीची लाज राखावी.

२) जशी स्त्रियांची अब्रू लुटली जाते मुघल सरदार तशीच अब्रू भारतीय संस्कृतीची, तिच्या अवशेषांची लुटत होते. जसे कि गो-हत्या, मंदिरं उध्वस्त करणे. अशावेळी दि बाल शिवाजीला मिळालेले संस्कार त्याचं नेतृत्वच असं घडवतात कि ‘शिवाजी राजा’ हे नाव ऐकताच शत्रूचा मनातल्या मनात पराभव होत असे. त्यांची कीर्ती ऐकल्यावर स्वराज्याकडे तसेच भारतीय संस्कृतीकडे वाईट नजरेने बघेल अशी हिंमतच कोणी करत नाही. अशाप्रकारे शिवाजी राजांना संस्कारांनी महान बनवून जिजाबाईंनी संस्कृतीची लाज राखली.  
    खरं पाहिलंत तर प्रवाहाच्या ओघात आणी विज्ञानाच्या अंध:कारात आज मुळची भारतीय स्त्रीच हरवून गेली आहे. ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’ हे वाक्य कुठेतरी बदलतांना दिसतंय. आज असे खूप कमी पुरुष दिसतात ज्यांच्या यशस्वीतेचं कारण स्त्री आहे, वर्षानुवर्षे असाच प्रकार घडत आल्याने संस्कृती लयास पावते आहे.
    भारतीय संस्कृतीच पाणी पिलेल्या किंवा संस्कार मिळालेल्या पुरूषाचं कधीही स्त्रीकरण होत नव्हतं. कारण त्याला घडवणारी एक महिला होती. आजपर्यंतच्या इतिहासात महिलेचं कधीही पुरूषीकरण झालं नाही. आज या सगळ्या समस्या निर्माण होण्याचं कारण म्हणजे स्त्री च झालेलं पुरूषीकरण आणी पुरूषाचं झालेलं स्त्रीकरण. या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी एकाच पर्याय असू शकतो. पुरूषी झालेल्या स्त्री ने महिला होण्याचा प्रयत्न करावा, आणी तिला महिला बनण्यासाठी लहानपणापासूनच तसे संस्कार, शिक्षण दिले गेले पाहिजे. मुलगी जेव्हा लहान असते तेव्हापासूनच तिच्यावर असे संस्कार झाले पाहिजे कि मोठं झाल्यावर ती आदर्श महिला बनेल. आणी असं झालं तर प्रत्येक घरात शिवाजी का निर्माण होणार नाही? नक्कीच होईल. आज शिवाजी निर्माण होत नाही याच कारण जिजाबाईच कुठे दिसत नाहीये.
    सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी स्त्री जर महिला बनण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला गावठी वगैरे बोलुन नाराज किंवा अपमानित करू नये. कारण बऱ्याचवेळा समाजाने वाईट म्हंटल्याने स्त्री कार्यापासून दूर जाते याला इतिहास देखील साक्षी आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून तिला प्रोत्साहित केले पाहिजे व महिला बनण्यास मदत केली पाहिजे. ह्या वर्षी महिला दिनाच्या या पर्वात आपण संकल्प करूया की आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक स्त्री ला आपण महिला बनण्यास मदत करू.
*This is my self opinion not intentionally heart someone's community, gender, and all*





टिप्पणी पोस्ट करा

12 टिप्पण्या

  1. तेजस ...खुपच छान आणि प्रेरणादायी विचार ..! !
    अशीच छान प्रगती करा ...आनंद वाटला ..! !

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद सर,
      हे सगळे विचार आणी प्रगती यांचं कारण म्हणजे तुमच्यासारख्या लोकांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे.

      हटवा
  2. Your blogs are very adorable and interesting.... Keep on creating such interesting and beautiful blogs👍

    उत्तर द्याहटवा
  3. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. एक स्त्री जे करू शकते ते एक पुरूष नाही करू शकत आणि एक पुरुष जे करू शकतो ते एक स्त्री नाही करू शकत..दोघांना भगवंताने विशेष बनवले आहे.लेख छान लिहिला आहे

    उत्तर द्याहटवा

how do you feel after read the blog?
If you have any doubt or suggestions about blog,
Please let me know.