वयाच्या एका ठरावीक टप्यावर गेल्यानंतर जसे आम्ही शाळेत जातो तीच प्रथा एकदा पशु पक्ष्यांमध्ये सुरू झाली. भरली त्यांची. जसे आमच्या शाळेत गणित, विज्ञान, इंग्रजी असे विषय असतात तसेच त्या शाळेत देखील उडणे,पोहणे,धावणे असे तीन महत्वाचे विषय होते.
त्या शाळेत पहिला पक्षी आला प्रवेश घ्यायला, बदक नावाचा. शिक्षकांनी सांगितलं ‘तीन compulsory विषय आहेत.उडणे,पोहणे,धावणे’. बदक म्हणाला, ‘पोहु तर उत्तम, धावण्याण्या सराव केला तर जमेल पण उडण्याचं कस करायचं?’ शिक्षक म्हणाले, ‘compulsory विषय आहे’. ‘अहो पण तो नैसर्गिक गुणच नाही ना माझा’, बदक म्हणाला. शिक्षक म्हणाले ‘degree हवी असेल तर उडावच लागेल,आणी आमच्याकडे writer/dummy वैगेरे चालत नाही, परीक्षा तुलाच द्यावी लागेल’.
बदकाला काय करावं तेच कळेना. पण दुनियेची रीत आहे की शाळेत गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, degree घेतली पाहिजे तर नोकरी मिळणार. त्या भीतीनं घेतलं बदकं ऍडमिशन. शिक्षक म्हणाले ‘घाबरतो कशाला आम्ही आहोत ना extra कोचिंग देऊ’. शिक्षकांच्या सांगण्यावरून बदकानं उत्तम असणारा पोहण्याचा गुण बाजूला ठेवुन धावण्याचा सराव सुरू केला. रात्रंदिवस धाऊन तो इतका दमायचा की परत उडायला जमतच नव्हतं. वर्षभर धावल्यामुळे पोहण्याचा सराव नाही, म्हणून परीक्षेला बसल्यावर धावण्यात कसाबसा पास झाला, पोहण्यात शिक्षकांनी promote केला आणी उडणे नापास.
मग त्या शाळेत दुसरा प्राणी आला खारुताई नावाचा. शिक्षकांनी सर्व माहिती सांगितली. ती म्हणाली, ‘धावते उत्तम, पण उडण्या-पोहण्याचं कस करायचं’? शिक्षक म्हणाले, ‘आम्ही आहोत ना पाठीशी’, सराव कर, सगळं व्यवस्थित होईल.
घेतलं तिनं ऍडमिशन, सराव सुरू झाला, खारुताई धावत धावत एका फांदीवर गेली व तिथून खालच्या शिक्षकाला विचारलं की, ‘मी वरून खाली उडी मारू का म्हणजे आपल्या उडणे या ही विषयाचा अभ्यास होईल’? शिक्षक म्हणाले ‘नाही, हे अभ्यासक्रमाच्या बाहेरचं आहे. उडण हे नेहमी खालूनच वर व्हायला पाहिजे, वरुन खाली नाही, पुस्तकांत असं नाहीए जस आहे तसंच करावं लागेल’.
तिसरा एक पक्षी आला शाळेत पोपट नावाचा. सगळी माहिती, विषय कळाल्यावर पोपट म्हणाला ‘मला शाळाच नको, बाहेर चांगलं आहे राघू-मैना-पेरु’. ते गेलं उडून. शिक्षक म्हणाले ‘विद्यार्थी पळून गेले तर शाळा कशी टिकणार? आणा त्याला धरून’. सगळे शिक्षक त्याला धरायला गेले. धरून आणले. नेमके शिक्षणाधिकारी येतील आणी हे गायब होईल ह्या भीतीने त्याला पिंजऱ्यात ठेवले.
आता पोपटाला धावता-पोहता येतंच नव्हतं, नैसर्गिक गुण उडने पण पिंजऱ्यात ते ही बंद, मग त्याने पिंजऱ्यात एक नवीनच गुण शोधून काढला-“ हलत्या पाळण्यावर सुरक्षित कसं बसायचं”. वर्षभर त्याचाच सराव केल्याने उडण त्याला जमेनाच. शेवटी परीक्षेला गेल्यावर कसाबसा तोल सावरून उडाला व पटकन एका फांदीला घट्ट धरून बसला, कारण वर्षभर पिंजऱ्यात फक्त तेवढंच शिकलेला.
शाळेत आणखी एक कोकिळा नावाचा पक्षी आला. कोकिळेचा गळा गोड आहे,ती गाते इतकी उत्तम की संपूर्ण सृष्टी भारावुन जाते. इतका अवर्णनीय गुण आहे पण ती रंगाने काळी आहे. एवढा अद्भुत गुण असूनही तिच्या मनात एक न्यूनगंड होता की आपण काळी आहोत, आपलं व्यक्तिमत्व चांगलं नाही, चार चौघात उठून दिसत नाही.
शेवटचा गरुड नावाचा पक्षी शाळेत आला. शिक्षकांनी सांगितलं, ‘तीन compulsory विषय- उडणे, पोहणे,धावणे’. गरुड म्हणाला ‘उडण्यात आपला हात कोणी धरू शकत नाही. धावायला मी जमिनीवर यायची काय गरज आहे? आभाळात भराऱ्या मारतो मी खाली कशाला येऊ? नको. विषय बदलून टाका’. आणी पोहणे तर जमणारच नाही.
पशुपक्ष्यांप्रमाणेच या शाळेचा परिणाम आमच्या जीवणावरही होत असतो. कितीतरी बदकं असतात आमच्यामध्ये जे स्वतःची कला नैसर्गिक गुण विकसित करायचं सोडून बाकीचे काय म्हणतात याकडे लक्ष देतात. शिक्षणाचा मूळ अर्थच विसरतात. शिक्षण (education) हा लॅटिन शब्द आहे. Educare, educere,
educatum विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधणं, त्यांना विकसित करणं, आणी त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण ह्या तीन गोष्टी जिथं होतात त्याला शिक्षण म्हणतात. दुर्दैवाने असं शिक्षण देणारी शाळाच आम्हाला उपलब्ध होत नाही. शैक्षणिक कल न ओळखताच तिथे पाठवल्यामुळे आमचे Engineering,
Medical चे विद्यार्थी आत्महत्येला बळी पडतात. जपान मध्ये अगदी अशाच प्रकारच शिक्षण दिलं जात म्हणून जपान औद्योगिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील विकसित आहे.
खारुताई प्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या पानांत कोंडून ठेवले आहे. पु.ल.देशपांडेंचा धडा शिकवल्यानंतर विचारतात की ‘ह्या पाठातून पु.ल.देशपांडे काय संदेश देतात?’. म्हणजे आम्ही काय अभ्यासायचं? पु.ल.देशपांडेंना काय वाटतं ते. आम्हाला काय वाटत ते बाजूलाच ठेवायचं. आमच्या डोक्यातले विचार अभ्यासक्रमाच्या बाहेरचे समजल्याने शेकडो वर्षांपासून आम्हाला Newton's Low, Ohm's Rule, einstein’s formula च अभ्यासावा लागतो, आमच्यात कोणी संशोधनच होऊ देत नाही, आणी मग एखाद्या दिवशी हे साठलेले विचार, क्षमता कुठेतरी चौकात, कट्ट्यावर बाहेर पडते आणी आमच्या चारित्र्याला डाग लागतो-‘ तरुण पिढी फार बिघडलीए,नाही?.
’ आता आता IT पार्क मधल्या programming मुळे आमच्यातल्या ज्ञानाला चालना मिळाली व सगळ्यांना समजलं की आमची तरुण पिढी सगळ्यांत हुशार आहे. कारण Google सारख्या बलाढ्य कंपनीचा CEO एक भारतीय नागरीक आहे.
पोपटाप्रमाणे सुरक्षित जीवनाची सवय आम्हाला लागली आहे एकदा का degree चा कागद हाती लागला की बाहेर ‘सरकारी नोकरी’ च घट्ट आणी सुरक्षित आयुष्य आम्ही शोधतो. साहस करणे, धाडस करणे, नव्या वाटा निर्माण करणे हे न करता पारंपरिक रस्त्याने चालण्याची सवय आम्ही लावली आहे. म्हणूनच व्यापार, उद्योगधंद्यात आम्ही सगळ्यात मागे राहतो.
कोकिळेप्रमाणे आमच्या ग्रामीण भागातील किंवा शहरातीलही काही विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो की मी ग्रामीण भागातला आहे, साध्या घरातला आहे, मला इंग्रजी येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की दोन माणसं, झाडाची दोन पानं, हाताची पाच बोटं सारखी नसतात तसेच आपल्यासारखा देखील कोणीच नाहीए असा अभिमान बाळगायला शिकलं पाहिजे.
जीवनाचं ज्ञान मुक्तपणे देण्याऐवजी चार भिंतीच्या शाळेत आम्हाला शिकवले जाते. अनुभवाचे चटके-फटके आम्हाला बसले की जीवनाचे ज्ञान मिळते व गरुड भरारी घेता येते. आभाळ सुद्धा छोटं पडेल असा अनुभव आमच्या पाठीशी असला पाहिजे.
आज ही परिस्थिती निर्माण होण्याचं कारण म्हणजे आपण शब्दांचे चुकीचे अर्थ करतो. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी सांगितले होते विज्ञानवादी व्हा. तेव्हाच्या विज्ञानात Physics, Chemistry, Biology नव्हतं. विज्ञान या शब्दाचा अर्थ – मिळवलेल्या ज्ञानाची कृती करणं होय. पण विज्ञानाचा अर्थ आम्ही वेळेची आणी कष्टाची बचत एवढाच केला. आपण ज्ञान मिळवतो, संकलित करतो पण त्याचा वापर करत नाही. ज्या दिवशी हा वापर होईल त्या दिवशी इकडे एकही बेरोजगार दिसणार नाही. आपलं सगळ्यांत मोठं दुर्दैव म्हणजे आपल्याला शाळेत चित्रकला शिकवतात पण चरित्रकला शिकवत नाही, जीवशास्त्र शिकवतात पण जीवनशास्त्र नाही. मग आपण मिळालेल्या परिस्थितीवर मात करायला नको का? म्हणून या मिळालेल्या वेळेत मिळवलेल्या ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर करण्याचा प्रयत्न करूया.
Good bye will meet soon
18 टिप्पण्या
खतरनाक
उत्तर द्याहटवाजबरदस्त
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाफार छान👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाOsm...
उत्तर द्याहटवावाह तेजस खूप सुंदर लिहलं आहेस...
उत्तर द्याहटवाखूप छान.
उत्तर द्याहटवासुंदर👌👌
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवाKhup ch chaan
उत्तर द्याहटवाVery nice 👌 keep it up 👍
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर आणि वास्तववादी लेख आहे भाऊ
उत्तर द्याहटवाअसच लिखाण आपल्या कडून सतत वाचकांसाठी उपलब्ध होवो या अपेक्षेसह आपणास मनःपूर्वक शुभेच्छा
👍🏻👍🏻
हटवाNice...
उत्तर द्याहटवाhow do you feel after read the blog?
If you have any doubt or suggestions about blog,
Please let me know.